Site icon e लोकहित | Marathi News

Viral Video: हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून पठ्ठ्याने पाण्यातच लावली आग

In winter, a fire was set in the water with cardboard to avoid getting cold while taking a bath

अंघोळ हे शरीराला ताजेतवाने करणारे कार्य असले तरी अनेकांना ते कंटाळवाने वाटते. त्यातल्या त्यात हिवाळ्याच्या दिवसांत अंघोळ करणे ( Bath in winter mornings) हे सगळ्यात मोठे टास्क असते. या दिवसांत प्रचंड थंडी असते. यावेळी सकाळी-सकाळी अंघोळ करताना भीतीने अंगावर काटा येतो. थंडीत अंघोळीसाठी गरम पाणी काढले तरी काही वेळातच ते थंड होते. यामुळे गारठ्यात अंघोळ नकोशी वाटते. मात्र हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून एका माणसाने भन्नाट जुगाड केले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (Viral video) अंघोळ करताना एक माणूस भर थंडीत आंघोळीसाठी तलावाच्या पाण्यात उतरला आहे. यावेळी त्याने अनोखी शक्कल लढवत थंडी वाजू नये यासाठी एकदम देसी जुगाड केला आहे. यामुळे त्याला भर थंडीत अंघोळही करता येतीये आणि थंडी देखील वाजत नाहीय. हा जुगाड सोशल मीडियावर लोकांना चांगलाच पसंतीस उतरला असून यावर अनेक जबरदस्त प्रतिक्रिया आल्या आहेत.

मोठी बातमी! गायरान जमीन अतिक्रमणाबाबत कोर्टाचा दिलासादायक निर्णय; वाचा सविस्तर

इन्स्टाग्रामवरील @style_star.mister या अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला गेला असून आतापर्यंत 3 लाखांच्याही पुढे या व्हिडीओला लाईक मिळाल्या आहेत. तलावात शेकोटी पेटवून या पठ्ठ्याने ऊब घेत अंघोळ केली आहे. थंडीत अंघोळ करण्याच्या या अनोख्या पद्धतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. यावर चक्क 2666 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

शेतकऱ्यांनो ‘या’ पद्धतीने सुरू करा स्वतःचा पशुखाद्य व्यवसाय; दुग्धव्यवसायात होणार वाढ

Spread the love
Exit mobile version