Site icon e लोकहित | Marathi News

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल

Important decision of the state government! Bonus of ST employees doubled

मुंबई : एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आता एक आनंददायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्यात येणार असल्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे”.

धक्कयादक! दहावीच्या विद्यार्थिनीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

यायाधी दिवाळी बोनसची घोषणा झाली होती, तेव्हा कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस घोषित कऱण्यात आला होता. पण हे पैसे पुरेसे नाहीत अशी जोरदार टीका सरकारवर (Govt) करण्यात येत होती. याच पार्शवभूमीवर सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करत नव्याने बोनस जाहीर केलाय. या निर्णयाचा फायदा जवळपास ८७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला होणार आहे.

कमी कालावधीत शेवग्याच्या ‘या’ दोन जाती देतात जास्त उत्पादन, मिळतोय बक्कळ नफा

Spread the love
Exit mobile version