Site icon e लोकहित | Marathi News

Crime News । धक्कादायक! ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु होती देहविक्री, सापळा रचत पोलिसांनी केला पर्दाफाश

illegal-work-started-in-a-beauty-parlor-in-thane

Crime News । ठाणे : अलीकडच्या काळात ब्युटी पार्लर, मसाज पार्लर, स्पा ला जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याचा वापर फक्त महिला नाहीतर पुरुष देखील करतात. तुम्हाला अनेक ब्युटी पार्लरची (Beauty parlour) दुकाने थाटल्याचे दिसेल. दिवसेंदिवस ब्युटी पार्लरचे दर देखील वाढले आहेत. अशातच ब्युटी पार्लरच्या नावाखाली देहविक्री (Illegal Work) करण्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सापळा रचत पर्दाफाश केला आहे. (Latest Marathi News)

Sunil Kedar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! माजी मंत्री सुनील केदार यांची तब्बेत बिघडली, रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

माहितीनुसार, ठाणे शहरात ही घटना घडली आहे. ठाण्यातील नौपाडा भागात ‘शमा फॅमिली ब्युटी सलोन अँड स्पा’ या व्यवसायाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) केला जात असल्याची तक्रार नौपाडा पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने पोलिसांनी पाऊल उचलले. पोलिसांनी सापळा रचत तेथे एक बोगस गिऱ्हाईक पाठवला. या व्यक्तीने मॅनेजरकडे एका मुलीची मागणी केली. (Thane Crime News)

Congress MLA Sunil Kedar । काँग्रेसला सर्वात मोठा झटका! बड्या नेत्याला ५ वर्षांचा तुरुंगवास

मागणीवरून मॅनेजरने त्या व्यक्तीसमोर दोन मुली उभ्या केल्या आणि त्यापैकी एका मुलीची निवड करण्यास सांगितली. ब्युटी पार्लरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री पटताच त्याने पोलिसांना इशारा केला. त्यावरून पोलिसांनी धाड टाकत स्पाच्या मॅनेजरला अटक करून दोन महिलांची सुटका केली. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या असा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Raj-Uddhav Thackeray । एकनाथ शिंदेंचं वाढलं टेन्शन! ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

Spread the love
Exit mobile version