Site icon e लोकहित | Marathi News

मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची जोरदार चर्चा

If you come to ask for votes, you will be insulted; Baramati's unique flex is hotly debated

बारामती: निवडणूका जवळ आल्या की ‘ताई माई अक्का विचार करा पक्का’ असे म्हणत प्रचार सुरू होतो. मतांसाठी लोक आपआपल्या परीने शक्कल लढवत असतात. कधी कधी मतदार सुद्धा त्यांना कंटाळून जातात. दरम्यान बारामती मध्ये सध्या एका फ्लेक्सची चर्चा रंगली आहे. ‘समाजकंटक, भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराला अभय देणारे उमेदवार मत मागण्यासाठी आल्यास अपमान करण्यात येईल’. अशा आशयाचा फ्लेक्स चांगलाच व्हायरल होत आहे. बारामती मधील एका व्यक्तीच्या घराबाहेर लावलेला हा फ्लेक्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

बारामतीत धक्कादायक प्रकार! महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लुटलं नंतर काढले नग्न फोटो

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेच सुरू झाले असताना बारामतीमधील वाघळवाडी ( Waghalwadi) येथील सुरेश यादव यांच्या घरासमोर हा अजब फ्लेक्स लावण्यात आला आहे. या गावात ग्रामपंचायत ( Grampamchayat Election) निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीसाठी गावातून सरपंचपदासाठी 13 व सदस्यपदासाठी 60 जणांनी फॉर्म भरलेले आहेत. त्याच झालं असं की सुरेश यादव ( Suresh Yadav) हे स्वतः सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार होते. परंतु, मतदार यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे यादव यांनी अशाप्रकारचा फ्लेक्स घराबाहेर लावला आहे.

देशातील कुठलीच व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार; केंद्र सरकारला दिले ‘हे’ आदेश

याआधी देखील सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये महत्त्वाच्या अशा संचालक पदाला डावलल्यानंतर, याठिकाणी काळ्या बोर्डवर केळ्यांचे चित्र असणारे बॅनर झळकले होते. याची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. मात्र हे बॅनर कोणी, कधी आणि का लावले याचे कोडे आज पर्यंत कोणाला सुटले नाही. आता सुद्धा गावातील अंतर्गत राजकीय डावपेचांमुळे सरपंच पदासाठी उभे न राहता आल्यामुळे सुरेश यादव यांनी हा फ्लेक्स आपल्या घरासमोर लावला आहे.

धक्कादायक! राज्यातील दीडशे गावे महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत

Spread the love
Exit mobile version