
मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde ) 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांना मिळाले. यानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली अनेक खासदार देखील शिंदे गटात सामील झाले.
यानंतर शिंदे गटातील नेत्यांकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले असून यावर निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे गटाला मूळ शिवसेना कोणाची? याबाबतचे पुरावे सादर करायला सांगितलेले आहेत.
अस असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत मोठे विधान केलेले आहे. “धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांपासून स्वीकारलेलं हे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं आणि त्यातून वाद-विवाद निर्माण करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर, ते जरूर स्वत:चा पक्ष काढू शकतात आणि स्वत: वेगळं चिन्ह ठरवू शकतात.” अस वक्तव्य शरद पवार यांनी केलेले आहे.
दरम्यान, “माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले होते. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह ‘घड्याळ’ घेतलं. आम्ही त्यांचं चिन्ह मागितलं नाही किंवा वाद वाढवला नाही. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत” अस देखील ते यावेळी म्हणालेले आहेत.