
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या गाण्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रॉल देखील केलं जात आहे.
सावधान! ‘या’ दोन कफ सिरपवर आलीय बंदी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला महत्त्वाचा इशारा
अमृता फडणवीस यांनी ट्रोलिंगच्या प्रकारानंतर ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राजकारणात आहेत, मात्र विरोधकांकडे त्यांच्यावर बोलण्यासाठी काहीही नाही, त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात, असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
नितेश राणेंना अमोल कोल्हेंचे प्रतिउत्तर; म्हणाले,”वडिलांच्या कर्तृत्वावर…”
त्या म्हणाल्या, “ जेव्हा नेत्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही. तेव्हा बऱ्याच त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. आणि विरोधक तेच करत आहेत. मात्र, आता मला ट्रोलिंगची सवय झाली असून मला त्या गोष्टीच काहीही वाटत नाही,” असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं.
राज्यात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा