
Divorce । पुणे : पती आणि पत्नीचे नाते (Husband and wife relation) इतर नात्यांपेक्षा खूप वेगळे असते. लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकदा पती-पत्नीची भांडणे होत असतात. हे वाद काहीवेळा खूप टोकाला जातात. यातून अनेकदा अनर्थ घडल्याचे देखील आपण पाहतो. काहीजण घटस्फोट घेतात. परंतु घटस्फोट मागणाऱ्या पत्नीकडे पतीची गजब मागणी केली आहे. (Latest Marathi News)
Pune Crime । पुणे तिथे काय उणे! गुन्हा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुन्हेगारांना घडवली अद्दल
ही घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील (Pune) एका व्यक्तीने आपल्या पत्नीकडून घटस्फोट मिळवून घेण्यासाठी आगळीवेगळी मागणी केली आहे. आफ्रिकन पोपट (African parrot) परत दे; तरच तुला घटस्फोट देईन, अशी अट या पतीने घातली आहे. ही मागणी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे या घटस्फोटाची सर्वत्र चर्चा होत आहे. घटस्फोटासाठी या जोडप्याने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे.
Elephant Attack । प्रवाशांनी खचाखच भरलेल्या कारवर पिसाळलेल्या हत्तीनं केला हल्ला, काच फोडली आणि…
दरम्यान, या जोडप्याचे २०२९ साली लग्न झाले आहे. परंतु, मागील चार पाच वर्षापासून त्यांच्या नात्यात मतभेद तयार झाले आहेत. लग्नापूर्वी पतीनं पत्नीला एक आफ्रिकन पोपट भेट म्हणून दिला होता. आता तो आफ्रिकन पोपट परत दिला तरच मी तुला घटस्फोट देईन अशी मागणी पतीनं न्यायालयात केली आहे. पतीच्या अजब मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.