Site icon e लोकहित | Marathi News

HSC & SSC Results | ‘या’ दिवशी लागणार दहावी बारावीचा निकाल

HSC & SSC Results | 10th 12th result will be declared on 'this' day

दहावी व बारावीच्या गुणांवरून करिअरची दिशा ठरत असते. म्हणून या परीक्षांना प्रचंड महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( SSC) व उच्च माध्यमिक शिक्षण ( HSC) मंडळाकडून घेण्यात आलेल्या यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याकडे पालक, विद्यार्थी व शिक्षकांचे लक्ष लागले आहेत. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुढच्या आठवड्यात हा निकाल जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Baramati | मोठी बातमी! अजित पवारांच्या बारामतीतील घराशेजारी तरुणीचा विनयभंग; दादा भडकले, म्हणाले…

यंदाची बारावीची (HSC) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडली. तर, दहावी (SSC)ची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत पार पडली. बारावीच्या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. मागील वर्षी जून मध्ये या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला होता. त्यामुळे यंदा देखील त्याच काळात निकाल जाहीर केला जाईल. असा अंदाज आहे.

LIC ची सरल पेन्शन योजना! वर्षाला मिळणार एक लाखांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या सविस्तर..

दहावी आणि बारावीचा परिक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बघू शकता. mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येतो. निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक व आईचे नाव टाकावे लागते. तसेच जन्मतारीख, प्रवेशपत्र, ओळखपत्र यांसारखे तपशील सुद्धा लागतात.

धक्कादायक घटना! केरळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू

Spread the love
Exit mobile version