Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवार यांचं लग्न नेमकं कसं जुळलं? यासाठी कोणी पुढाकार घेतला; जाणून घ्या त्यांच्या लग्नाबद्दल काही खास माहिती

How did Sharad Pawar's marriage work? Who took the initiative for this; Know some special information about their marriage

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत शरद पवारांना लोक मानतात. त्यांच्या राजकीय भूमिकांची चर्चा कायम होत असते. मात्र लोकांना राजकारणाबरोबर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची देखील नेहमीच इच्छा असते. दरम्यान आज आपण त्यांच्या लग्नाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत.

ब्रेकिंग! दिल्लीनंतर आता मध्यप्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या आहेत. 1 ऑगस्ट 1967 या दिवशी बारामती या ठिकाणी शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह झाला. मात्र अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे यांचे लग्न नेमके कोणी जुळून आणले. आता या प्रश्नाचे देखील तुम्हाला उत्तर मिळणार आहे.

“… तर देवाशपथ सांगतो मी मिशा काढून टाकेन”, उदयनराजे भोसलेंचं चॅलेंज

शरद पवारांचे लग्न हे त्यांच्या जेष्ठ बंधूनी जमवले होते. शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू माधवराव पवार यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांना शरद पवार यांचे लग्न जमवायचे आहे असे सांगितले होते. यावेळी सदू शिंदे यांच्या मुलीसाठी माधवराव यांनी शरद पवार यांच स्थळ सुचवलं. त्यांनतर प्रतिभाताई यांना पाहाण्याचा कार्यक्रम ठरला. यावेळी शरद पवार यांनी प्रतिभाताईंना पाहिले सु्द्धा नाही आणि लग्नाला होकार दिला होता. ज्यावेळी प्रतिभाताईंनी पाहण्याचा कार्यक्रम होता त्यावेळी शरद पवार वर्तमानपत्र उघडून चाळत बसले होते. असत म्हंटल जात आहे.

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! पोलीसही चक्रावले

दरम्यान, शरद पवार यांनी लग्नाला होकार देताच 1ऑगष्ट 1967 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यांचा विवाह हा बारामती या ठिकाणी पार पडला. त्यांच्या लग्नादिवशी बारामतीत प्रचंड पाऊस देखील होता.

कांदा पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला!

Spread the love
Exit mobile version