
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) हे उपक्रमशील नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांनी महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘महाव्हिजन फोरम’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. सोशल मीडियावर देखील ते कायम ऍक्टिव्ह असतात. काही दिवसांपूर्वी ते #AskRohitPawar या ट्रेंडमुळे चर्चेत होते. आता देखील एका मुलाखतीमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
ब्रेकिंग! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता संजय दत्त गंभीर जखमी
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या ‘मराठी किडा’ (Marathi Kida) युट्यूब चॅनेलला रोहित पवार यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान रोहित पवार ( Rohit Pawar) यांना आवडती अभिनेत्री कोण? असे विचारण्यात आले होते. यावेळी रोहित पवारांनी दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे.
मोठी बातमी! शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट
तुमची आवडती अभिनेत्री कोण? असे मुलाखतीमध्ये विचारताच रोहित पवार बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचे नाव घेतात. यानंतर तुम्ही कधी आलियाला भेटला आहात का? असे देखील रोहित पवारांना विचारले जाते. यावर उत्तर देताना देखील ते ‘नाही’ असे म्हणतात. यापुढे मुलाखतकार रोहित पवारांना म्हणतो की, रोहित पवारांना आलिया आवडते, या वाक्याचा विरोधकांनी वापर केला तर? यावेळी रोहित पवार आपल्या शैलीत उत्तर देत सांगतात की, ” एकदा वापर करून बघा, त्याला काय उत्तर द्यायचं ते मी देईल.”
“एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! आदित्य ठाकरे यांनी केला मोठा गौप्यस्फोट
महत्त्वाची बाब म्हणजे या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी आपल्या पत्नीचे कौतुक केले आहे. माझी पत्नी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली असून सुद्धा ती घर सांभाळते. हाऊस वाईफ होणे सोप्पे नसते. मी लाखो लोकांना सांभाळू शकतो, त्यांना हँडल करू शकतो. मात्र सुट्टीच्या दिवशी एक तासही घरी मुलांना हँडल करणे मला अवघड वाटते. असे म्हणत रोहित पवारांनी आपल्या बायकोचे कौतुक केले आहे.