Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; नको तेच बोलले अन्..

Gopichand Padalkar's tongue slipped while talking about Sharad Pawar; That's what he said and..

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. नेहमीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. ते शरद पवार यांच्यावर ही टीका करताना कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत एकदम खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत असतात. सध्या देखील गोपीचंद पडळकर यांनी पवारांचा एकेरी उल्लेख करत अरे तुरेची भाषा वापरली आहे.

जेथे शिवसेनेचा खासदार, ती जागा शिवसेनाच लढवणार; श्रीकांत शिंदे यांची माहिती

शरद पवार यांना मस्ती आलीय, असं ओपीचंद पडळकर एकेरी उल्लेख करताना म्हणाले आहेत. पवारांबाबत बोलताना पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…

गोपीचंद पडळकर हे सोलापुरातील मंद्रूप येथील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान ही होळकरांची जहाँगिरदारी आहे, असं देखील पडळकर म्हणाले आहेत.

भीषण अपघात! कोंबड्या वाहून नेणाऱ्या दोन पिकअपची एकमेकांना जोरदार धडक

Spread the love
Exit mobile version