खुशखबर! आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार ‘इतकं’ अनुदान

Good news! Now the government will give 'so much' subsidy to the farmers for buying tractors

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा देखील होतो .दरम्यान अशातच देशभरातील लाखो आणि करोडो शेतकऱ्यांसाठी (Farmer) आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे (Tractor) स्वप्न दिवाळीच्या मुहूर्तावर साकार होणार आहे. दरम्यान यासाठी शासन (Government) मोठ्या प्रमाणात मदत करत आहे.

Udayanraje Bhosale: “…नाहीतर वाडगं घेवून बसायला लागेल”, कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केले मत

केंद्रसरकारने शेतकऱ्यांना सहजरीत्या ट्रॅक्टर खरेदी करता येण्यासाठी ट्रॅक्टर अनुदान (Subsidy) योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाते. महत्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकरी घेऊ शकतात. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांकडून अर्ज मागवतात. दरम्यान शेतकऱ्यांना हवे असल्यास केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने ट्रॅक्टर अनुदान (Tractor Subsidy) योजनेचा लाभ घेऊन तुम्ही ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात.

राज्यात साडेआठ हजार शाळांमध्ये राबवली जाणार ‘पीएमश्री’ योजना, वाचा नेमकी काय आहे ही योजना?

योजनेसाठी आवश्यक पात्रता

1) पहिली आवश्यक पात्रता म्हणजे शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.

2) दुसरी गोष्ट म्हणजे लाभार्थ्याचे बँक खाते हे आधार आणि पॅन लिंक केलेले खाते असावे.

3) लाभार्थी शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.

4) तसेच शेतकऱ्याकडे या आधीच एखादा ट्रॅक्टर नसावा.

5) एका शेतकऱ्याला फक्त एक ट्रॅक्टर खरेदी केल्यास अनुदान मिळेल.

कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घुसला घरात; पण शेतकऱ्याने केला जेरबंद

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते-तपशील-पासबुकची प्रत, शेतजमिनीचा सातबारा प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

उर्फीचा टॉपलेस व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी घेतला समाचार; पाहा VIDEO

असा करा किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज

किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. तसेच यासोबतच या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशीही संपर्क साधू शकतात.

Asaduddin Owaisi: “सर्वात जास्त कंडोम तर…” मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *