Site icon e लोकहित | Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता

Good news for ST employees! Diwali bonus is likely to be announced

मुंबई : एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये दिवाळी बोनस बाबत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रियकरासाठी चक्क मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्त्या

ही बैठक दुपारी १ वाजता होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला महिन्याला अडीचशे कोटी रुपये लागतात पण सरकारकडून महामंडळाला फक्त १०० कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफचा हप्ता देखील रखडला आहे.

Varun Dhawan: वरुण धवनने ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची केली घोषणा केली, सारा अली खानची अशी केली नक्कल

या पार्श्वभूमीवर आज बैठक होणार आहे. मुंबई (Mumbai) महापालिका कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारी यांना मोठा बोनस जाहीर आहे. त्यामुळे यावर्षी चांगला बोनस मिळेल अशी आशा एसटी कर्मचाऱ्यांना आहे.

Cotton: दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाला मिळाला अकरा हजारांचा भाव, पहिल्याच दिवशी समाधानाचे वातावरण

Spread the love
Exit mobile version