
PM Kisan Yojana। केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली. या योजनेचा (PM Kisan) प्रत्येक वर्षी कोट्यवधी शेतकरी लाभ घेतात. नुकताच या शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा १४ वा हप्ता जमा करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Latest Marathi News)
धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, एका पोलिसासह चार जणांचा बळी
कारण आता या योजनेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. प्रत्येक वर्षी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा केले जातात. 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. परंतु आता या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 8000 रुपये जमा होतील.
Sharad Pawar । … तर राज्यात सत्तांतर होईल; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात याविषयी चर्चा सुरु होती. सरकार फेब्रुवारी 2023 पासून जादा हप्त्याची तरतूद करू शकते, असा दावा केला जात होता. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा केली जाणार होती. लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha elections) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेत बदल होऊ शकतात.