PM Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये

Good news for farmers! 2000 rupees will be deposited in the account on 'this' day

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवत असते. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनांचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. यापैकीच केंद्र सरकारची एक योजना म्हणजे किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) होय. या योजनेची (PM Kisan Yojana) सुरुवात केंद्र सरकारकडून (Central Govt) 2019 साली सुरुवात करण्यात आली. सध्या लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! फसवून सही घेतली असे बोलणारा आमदार पुन्हा अजित पवारांकडे

केंद्र सरकार या योजनेअंतर्गत (PM Kisan) प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये जमा करत असते. हे लक्षात घ्या की हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. या योजनेचे आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना पुढच्या म्हणजे 14 व्या हप्त्याची (PM Kisan 14th Installment) आतुरता लागली आहे.

धक्कादायक! स्कुल बसचा भीषण अपघात; सहा जण जागीच ठार

जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढचा हप्ता 15 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी अपडेट केले नसेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही.

Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने केली टोमॅटोची लागवड, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी अपडेट करून घ्या. तुम्हाला ऑनलाइन केवायसी करण्यासाठी सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला E-KYC असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्ही E-KYC पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर तुमच्या लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो अर्ज सबमिट करा.

Petrol Diesel Price । पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले कमी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Spread the love