Site icon e लोकहित | Marathi News

Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! फॅमिली प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत

Good news for Airtel customers! Family plan starts, know the price

देशातील आघाडीच्या Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त आणि परवडणारा रिचार्ज देत आहे. त्यांच्या उत्तम रिचार्जमुळे, या कंपन्या अनेकदा एकमेकांना कठीण स्पर्धा देताना दिसतात. काही दिवसांपूर्वी जिओने आपला नवीन फॅमिली प्लान Jio Plus लाँच केला होता.त्यानंतर आता ती एअरटेलनेही जिओला टक्कर देण्यासाठी दमदार फॅमिली प्लॅन लॉन्च केला आहे. त्यामुळे तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

“…गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा”, नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

एअरटेलने आपल्या नेटवर्कमध्ये अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी मागच्या सोमवारी नवीन ‘फॅमिली प्लॅन’ लाँच केला आहे. या नवीन फॅमिली प्लॅनची ​​किंमत ५९९ रुपये ते १,४९९ रुपये आहे. याशिवाय, कंपनीने 799 रुपयांपासून ते 2,299 रुपयांपर्यंतचे ब्लॅक फॅमिली प्लॅनही लॉन्च केले आहेत. हे रिचार्ज प्लॅन डीटीएच आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवेसह सादर करण्यात आले आहेत.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मविआ नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध!

एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत ५९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दोन मोबाईल कनेक्शन मिळतील. याशिवाय तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 105 जीबी डेटाचा लाभ मिळेल. त्याचबरोबर फायद्यांबद्दल पाहिलं तर, या प्लॅनसह, वापरकर्त्याला 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम सबस्क्रिप्शन तसेच Disney + Hotstar आणि Airtel Xstream सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मिळत आहे.

“तरुण दारूच्या नशेत थेट आगीत पडला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा Video

त्याचबरोबर, 1,499 रुपयांच्या फॅमिली प्लॅनमध्ये वापरकर्त्याला पाच मोबाइल कनेक्शन मिळतात. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि ३२० जीबी डेटा दररोज मिळतो. अतिरिक्त फायद्यांमध्ये, OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime 6 महिन्यांसाठी आणि Disney + Hotstar एक वर्षासाठी तसेच Netflix आणि Airtel Xstream चे मोबाइल सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनसह उपलब्ध आहेत.

भर कार्यक्रमात गौतमी पाटीलला गडी भिडला; व्हिडीओ व्हायरल

Spread the love
Exit mobile version