खुशखबर! व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात

Good news! Commercial cylinder price cut by 'so much' Rs

सध्या नवरात्रोत्व सुरू असून थोड्याच दिवसात दिवाळीचा सण येणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर म्हणजे सणासुदीच्या दिवसांत देशातील (India) व्यावसायिक सिलिंडरच्या किमती मध्ये कपात करण्यात आलेली आहे. ही कपात आज पासून सुरू केली आहे. दरम्यान इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (INDIAN OIL CORPORATION LIMITED) नुसार आजपासून दिल्‍लीत इंडेनच्या (Inden gas cylinder) 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती त(price) 25.5 रुपये तसेच मुंबईमध्ये 32.5, चेन्नईमध्ये 32.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Yavatmal: यवतमाळच्या हर्षल नक्षणे बनवली स्वयंचलित हायड्रोजनिक कार, फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर

आता असा असेल सिलेंडरचा नवीन दर?

दिल्लीत याआधी इंडेनचा 19 किलोचा सिलेंडर 1885 रुपयांना मिळत होता. परंतु तो आता 1859.5 रुपयांना मिळणार आहे. हाच इंडेनचा 19 किलोचा सिलेंडर कोलकत्ता मध्ये 1995.50 रुपयांना मिळत होता. दरम्यान आता तो 1959 रुपयांना मिळणार आहे. तसेच मुंबईमधील इंडेनच्या 19 किलोच्या सिलेंडच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर आधी सिलेंडर 1844 रुपयांना मिळत होता तर तो आता 1811.5 रुपयांना मिळेल.

धक्कादायक! इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ

नैसर्गिक वायूच्या किमतीत शुक्रवारी 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. इतकंच नाही तर येणाऱ्या काळात देशात खत निर्मिती आणि वाहन चालवण्यासाठी जो गॅस वापरला जातो तो गॅस देखील आता महागण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 27 रुपयांनी वाढ झाली असून आता 6,727 रुपये प्रति बॅरल मिळणार आहे.

Satara: साताऱ्यात बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर, मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी केली बेदम मारहाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *