Site icon e लोकहित | Marathi News

आनंदाची बातमी! शुक्रवारपासून जनावरांचे बाजार सुरू होणार

Good news! Animal market will start from Friday

लंपी आजारामुळे मागील काही महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद होते. लंपीमुळे ( Lumpi) जनावरांचे मृत्यु होत होते. हा संसर्गजन्य रोग पसरून आणखी मृत्यू होऊ नयेत म्हणून मागील साडेतीन महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते. दरम्यान लंपीची तीव्रता कमी झाल्याने घोडेगाव येथील जनावरांचे बाजार ( Animal Market) पुन्हा एकदा सुरू होत आहेत. शुक्रवारपासून जनावरांचे बाजार सुरू होत आहेत. याबाबत माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली असून यामुळे पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होणार? अनेक संघटनांकडून होतीये मागणी

घोडेगाव येथे याआधी गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांचा बाजार नियमित सुरू होता. यामध्ये लाखोंची उलाढाल केली जात होती. मात्र लंपीमुळे हा बाजार बंद होता. याकाळात ही लाखोंची उलाढाल थांबली होती. आता उद्यापासून ( दि. 22) पुन्हा एकदा बाजार सुरू होणार आहे. यामुळे गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांच्या बाजारात लाखोंची उलाढाल होणार आहे.

ब्रेकिंग! उर्फी जावेदला धमकी देणारा आरोपी अटकेत

हा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी भरपूर प्रयत्न केले होते. यामुळे शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल व व्यवसायिक यांनी गडाख यांचे आभार मानले आहे. खरंतर जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार, लसीकरण यामुळे लंपी आजार आटोक्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने देखीक बाजार सुरू करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बहिरोबावाडीच्या सरपंचपदी कोमल शरद यादव विजयी

Spread the love
Exit mobile version