
अजित पवार 9Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडली आहे. पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्याने राज्याचे राजकारण पुन्हा तापले आहे. पक्ष आणि चिन्ह कोणत्या गटाला मिळेल याचा निर्णय निवडणूक आयोग (Election Commission) देईल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
दिल्लीत उद्या शाळा बंद राहणार, मुसळधार पावसामुळे सरकारने घेतला निर्णय
बंडानंतर पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना कोणत्या गटात सहभागी व्हावे, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) हे कोणत्या गटाच्या बाजूने आहेत याचे उत्तर बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. “माझी भूमिका तटस्थ असून विकास कामासाठी मी ज्यांच्याकडे जावे लागू शकते त्यांच्याकडे मी जाईल, असे बेनके यांनी स्पष्ट केले आहे.
असं काय घडलं की पुण्यात टोमॅटोवरुन भाजी विक्रेता आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
पुढे त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. बोलताना बेनके म्हणाले की, “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 2024 च्या निवडणूक लढविण्याची माझी कसलीच मानसिकता नाही. मी असे जाहीर करतो की येणाऱ्या काळात मी समाज कार्यात कार्यरत राहील, असे अतुल बेनके यांनी जाहीर केले आहे.
Sharad Pawar । ‘शरद पवार सैतान, या सैतानाला पाप फेडावे लागत आहे’, ‘या’ बड्या नेत्याची जहरी टीका
हे ही पहा