Site icon e लोकहित | Marathi News

मासिक पाळीदरम्यान मुलींना मिळणार सुट्टी! सरकारचा मोठा निर्णय

Girls will get a holiday during menstruation! Big decision of Govt

केरळ सरकारने नुकताच शिक्षकांना ‘सर’ ‘मॅडम’ न संबोधता ‘टिचर’ म्हणण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. दरम्यान केरळ सरकारने विद्यार्थीनींसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केरळ सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक पाळीदरम्यान सुट्टी ( Holiday During Menstrual Cycle) मंजूर करण्यात आली आहे. केरळ सरकारच्या या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

ऋषभ पंतला ‘इतक्या’ दिवस राहवे लागणार रुग्णालयामध्ये; समोर आली महत्वाची अपडेट

मासिक पाळीमध्ये मुलींना मोठ्या प्रमाणात वेदना होतात. या वेदनांपासून त्यांना आराम मिळावा यासाठी सरकारने ( Kerala Government) हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व विद्यापीठांमध्ये याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्चशिक्षण मंत्री के.आर. बिंदू ( K.R Bindu) यांनी दिली आहे.

बारामतीमध्ये ‘कृषीक 2023’ची जोरदार तयारी! 170 एकर परिसर होणार कृषिमय

के. आर. बिंदू यांनी सोशल मीडियावर फेसबुक पोस्ट टाकत या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थीनींना येणाऱ्या मानसिक व शारीरिक अडचणी लक्षात घेता सर्व विद्यापीठांमध्ये हा निर्णय लागू करण्यासाठी पाऊले उचलली जातील. यासाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थी संघटना व कुसॅटचे अधिकारी कौतुकास पात्र आहेत. असेही बिंदू यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

निवडणूक आयोग त्यांच्या घरचा आहे का? सुषमा अंधारे शिंदे गटावर आक्रमक

Spread the love
Exit mobile version