
राज्य सरकार शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवित असते. मनरेगा सिंचन योजनेमार्फत शेतकऱ्यांना विहीरीसाठी अनुदान दिले जात होते. पंरतु, या योजनेतील काही अटींमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता होत न्हवता. ही बाब लक्षात येताच सरकारने या अटी रद्द केल्या आहेत.
राजू शेट्टी शरद पवारांवर भडकले! शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला आरोप
मनरेगा सिंचन योजनेतील दोन विहिरींमध्ये असणारी 150 मीटर अंतराची अट आता सरकारने रद्द केली आहे. यामुळे अर्ज करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला आता विहीरीसाठी सरकारमार्फत अनुदान मिळणार आहे.
राजू शेट्टी शरद पवारांवर भडकले! शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला आरोप
मनरेगा सिंचन विहरीचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी खालील महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
विठ्ठला…बळीराजाला सुख समृद्धी दे…!, आ.बबनराव पाचपुते यांचे विठ्ठल चरणी साकडे
1) 7/12 चा ऑनलाईन उतारा
2) जॉबकार्ड ची प्रत
3) 8 अ चा ऑनलाईन उतारा
4) सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
5) सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.
भर रस्त्यावर बायकोने नवऱ्याला दिला चोप; पाहा VIDEO
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिमीच्या सात बारा उताऱ्यावर विहरीची नोंद नसायला हवी. तसेच शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.40 (एकर) हेक्टर क्षेत्र असायलाच हवी.