Site icon e लोकहित | Marathi News

Gautami Patil | गौतमीच्या आडनावाच्या वादात जळगावच्या पाटलांनी दिली साथ; म्हणाले, “पाटील ही पदवी आहे मक्तेदारी नाही”

Gautami Patil Patals of Jalgaon support Gautami's surname dispute; Said, "Patil is a title not a monopoly"

अगदी कमी वेळातच गौतमी पाटीलने (Gautami Patil) महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गौतमीवर कितीही आरोप झाले तरी तिच्या चाहत्यांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. या चाहत्यांच्या गर्दीमुळेच गौतमी पाटील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मात्र आता एका वेगळ्याच गोष्टीवरून गौतमी पाटील अडचणीत आली आहे. सध्या तिच्या आडनावावरून राज्यात वाद सुरु झाला आहे. पुण्यामध्ये (Pune) गौतमीच्या पाटीलच्या आडनावावरून एक बैठक पार पडली. यामध्ये मराठा संघटनांनी तिच्या ‘पाटील’ आडनावाला विरोध केला आहे. (Maratha Mahasangh Opposes surname of Gautami Patil)

विश्वासतील व्यक्तीनेच कापला केसाने गळा! आंबे देतो म्हणून चिमुरडीला सोबत घेऊन गेला आणि केला लैंगिक आत्याचार

पुण्यामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये गौतमीचे आडनाव ‘पाटील’ नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही तर चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही’ असा इशारा मराठा संघाकडून गौतमीला देण्यात आला आहे.

अधिकाऱ्याचा ९६ हजारांचा फोन तलावात पडला अन् त्याने चक्क केला २१ लाख लीटर पाण्याचा उपसा, नंतर करण्यात आली ‘ही’ मोठी कारवाई

यावर बोलताना गौतमी म्हणाली की, “माझे नाव पाटील आहे. मी पाटीलच नाव लावणार ना ! आता कोण काय बोलतोय मला फरक पडत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे.” गौतमीच्या या वक्तव्यानंतर तिच्यासाठी जळगावच्या मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक सुरेंद्र पाटील धावून आले असून त्यांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. पाटील ही पदवी असून मक्तेदारी नाही. मराठा समाजाप्रमाणे इतर समाजात देखील पाटील हे आडनाव लावले जाते. त्यामुळे गौतमीला आडनावावरून इशारा देणे योग्य नाही. असे सुरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version