Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ कारणामुळे मी राजकारणापासून लांबच राहिलो; रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

For 'this' reason I stayed away from politics; Riteish Deshmukh made a big revelation

रितेश देशमुख सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. गेल्या काही दिवसापासून त्याच्या वेड चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. रितेश व जेनेलियाचा वेड ( Ved Movie) हा चित्रपट प्रदर्शित होऊन तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तरीदेखील हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने लोकांना इतके वेड लावले आहे की, लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठणार आहे.

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना का डावलले? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा अभिनेता असला तरी राजकीय घराण्यामध्ये झाला आहे. रितेशची वडील दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याबरोबर त्याचे भाऊ देखील राजकारणामध्ये सक्रीय आहेत. मात्र, परिपवारामध्ये राजकीय वारे वाहत असताना तो राजकारणात का नाही गेला. मनोरंजन क्षेत्र का निवडले. आता याबाबत रितेश देशमुखने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.

Gautami Patil: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते ‘इतकं’ मानधन!

रितेश देशमुख म्हणाला, “ मी राजकारण माझ्या भावांवर सोडले आहे. राजकारण माझे काम नाही माझे काम चित्रपट करणं आहे. मी सध्या तेच करतोय. आयुष्यभर मी सत्ता पाहिली आहे. त्यामुळे मला कधीही सत्तेबद्दल आकर्षण वाटले नाही. मी माझ्या मनोरंजन क्षेत्रामध्ये खूप आनंदी आहे आणि हीच त्याची ताकद आहे.” असं रितेश देशमुख म्हणाला आहे.

‘वेड’ चित्रपटामध्ये होणार मोठे बदल; रितेश देशमुखने केली मोठी घोषणा

Spread the love
Exit mobile version