
आपल्या लावणीच्या तालावर गौतमीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. सोशल मीडियावर देखील ती चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान गौतमी आता वेबसिरीज मध्ये पदार्पण करणार आहे. गौतमीने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
रामदेव बाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे; सुषमा अंधारे यांची मागणी
मागील काही दिवसांपासून नृत्य करण्याच्या शैलीवरून तिच्यावर आरोप देखील केले जात होते. इतकंच नाही तर महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या ( Gautami Patil) कार्यक्रमांवर बंदी आणण्यात यावी. अशी मागणी देखील करण्यात आली होती.
मात्र गौतमीने भविष्यात असे होणार नाही असे सांगून याबाबत सर्वांची माफी मागितली आहे. यामुळे हे प्रकरण आता निवळले आहे. दरम्यान दोन-तीन गाणी, चित्रपट व वेब सिरीज साठी आपण आता काम करत आहोत अशी माहिती गौतमी पाटीलने दिली आहे.
मात्र या चित्रपट, वेबसिरीज व गाण्यांच्या नावाबद्दल ( movie, web series & songs) आणि त्यांच्या विषयाबद्दल गौतमीने अजूनही कुठलाच खुलासा केलेला नाही. मात्र तिचा ‘घुंगरू’ हा अगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विश्वास नांगरे पाटील यांच्यासाठी धक्कादायक बातमी; कोरेगाव भीमा प्रकरणी होणार चौकशी