
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) जनपद कासगंजमधून सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाने स्वत:च्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण
घटना घडली अशी की, मुलीला तीच्या मनाने लव्ह मॅरेज (Love Marrige) करायचं होत. मात्र लव्ह मॅरेज करण्यासाठी तीच्या वडिलांचा तीला विरोध होता.
वडिलांनी अनेकदा मुलीला समजावून देखील सांगितले होते. पण मुलगी मात्र ऐकायला तयार नव्हती ती आपल्या मतावर ठाम होती. यावरुनच दोघांमध्ये चांगल भांडण झालं. यावेळी मुलीने माझे निर्णय मी स्वत: घेण्यास समर्थ आहे, मी स्वत: कमवते आणि स्वत:च्या पायावर उभी आहे असं वडिलांना उत्तर दिलं. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी थेट गोळ्या घालून मुलीची हत्या केली आणि त्याचबरोबर स्वतः देखील आत्महत्या केली.
भीषण अपघात! एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार
ही घटना घडताच पत्नी आणि मुलाने आरडाओरडा केला. त्यानंतर तेथील स्थानिक नागरिक देखील जमा झाले. त्यानंतर त्यांना लगेच उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र उपचार करण्याआधीच दोघांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी लॉजवर टाकली धाड सापडली कॉलेजची मुलगी; समोर आलेली माहिती वाचून तुम्हालाही बसेल धक्का!