पुलाच्या कठड्याला धडकून बसचा भीषण अपघात; चालकासह १५ जण जखमी

Fatal accident of a bus hitting a bridge; 15 people including the driver were injured

सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कऱ्हाडहून सातारा दिशेकडे भरधाव जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. (Accident News)

ब्रेकिंग! अजित पवार मुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदे राजीनामा देणार? पाहा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

एसटी चालकाचा ताबा सुटल्याने शिवडे (ता. कऱ्हाड) येथील मांड नदीवरील (Mand River) पुलाच्या कठड्याला एसटी धडकून महामार्गावर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चालक व वाहकासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

फिरायला जाताय तर सावधान! ट्रेकला गेलेला तरूण पुराच्या पाण्यात गेला वाहून; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघटनाची माहिती मिळताच घटनास्थळी तेथील लोकांनी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.

Accident | सर्वात भीषण अपघात! दरीमध्ये बस कोसळून २७ प्रवासी ठार

माहितीनुसार, एसटीमध्ये एकूण तीस प्रवासी होते. यामध्ये या अपघातात जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

शेतकऱ्यांनो करा ‘या’ तांदळाची शेती, किलोला मिळेल 500 रुपये भाव

Spread the love