
Yuvraj Singh । चंदीगड : भारतीय संघाला (Indian team) वर्ल्ड कप (World Cup) जिंकवून देण्यात भारताचा माजी स्टार ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंहचा (Yuvraj Singh) मोठा वाटा आहे. सोशल मीडियावरही (Social media) तो सक्रिय असतो तसेच लाखो चाहते आहेत. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आताही तो चर्चेत आला आहे परंतु ते एका वेगळ्या कारणामुळे. त्याच्या परिवारासोबत धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)
Kolhapur Flood | ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये पूरस्थिती? पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज सिंहची आई शबनम सिंह (Shabnam Singh) यांना एका महिलेने 40 लाख रुपयांची मागणी केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी पैसे दिले नाही तर संपूर्ण परिवाराची बदनामी करेल, अशी धमकी देखील दिली आहे. या प्रकरणी गुरुग्राममधील डीएलएफ फेज-1 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Sports News)
हेमा उर्फ डिंपी असं आरोपी महिलेचं नाव आहे. शबनम सिंह यांना धमकी (Yuvraj Singh Mother Threatened) मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. आरोपी महिलेकडे पैसे जमा करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितला. 5 लाख देण्याचं ठरल्यानंतर पोलिसांनी सापाळा रचून अटक केली. माहितीनुसार 2022 मध्ये युवराज सिंहचा छोटा भाऊ जोरावर सिंहच्या देखभालीसाठी आरोपी महिलेला ठेवले परंतु तिला 20 दिवसांच्या आत कामावरून काढून टाकले. कारण ती त्याच्या भावाला तिच्या जाळ्यात अडकवत होती.
वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा