
सध्या कांद्याची स्थिती ही खूपच बिकट झाली आहे. तरी देखील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु तरीदेखील यामध्ये काळाबाजार होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
पक्षबांधणीसाठी स्वतः रश्मी ठाकरे मैदानात उतरणार! लवकरच सुरू करणार राजकीय दौरे
जिल्ह्यातील बाजार समितीतील खरेदीदार व्यापाऱ्यांकडून बनावट पावत्या तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. अशा बाजार समिती व व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विठेवाडी येथील शेतकरी सुनील सोनवणे यांनी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांनी संगनमताने कांदा अनुदान मिळवण्यासाठी बनावट व्यवहार दाखवून गैरप्रकार केला आहे, असे यावेळी सुनिल सोनवने म्हटले.
मोठी बातमी! पुण्यामध्ये पावसाला सुरवात
यामुळे व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आले आहे. सुनील सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. परंतु मुख्यमंत्री दौरा असल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले. खरेदी केलेला कांदा यांनी कुठे दिला याची चौकशी करण्यात यावी. बनावट पावत्या तयार केलेल्या व्यापारी वर्गाचे बँकखाते तपासावे. अशी मागणी सुनील सोनवणे यांनी केले आहे.