Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde : भंडाऱ्यातील बलात्काराच्या घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Eknath Shinde's reaction to the rape incident in Bhandara, said...

भंडारा : भंडाऱ्यात सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल. तसेच आरोपींवर कठोर कारवाई होईल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

“भंडारा जिल्ह्यातील अत्याचाराचा प्रकार अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. याविषयी मी स्वतः पोलीस महानिरिक्षकांशी बोललो आहे. पीडित महिलेच्या प्रकृतीची काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत.” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल. तसेच दोषींवर तात्काळ योग्य ती कठोर कारवाईकेली जाईल,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

Spread the love
Exit mobile version