Site icon e लोकहित | Marathi News

मातोश्रीवर येऊन रडले, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाऊ द्या रे. ते लहान..”

Eknath Shinde's reaction to Aditya Thackeray's statement came and cried on Matoshree; Said, "Let them be given any attention. They are small.."

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याच्या सत्तांतराच्या वादाबाबत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र निकालापूर्वीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.

अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत!

त्याचबरोबर “भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्री या निवास्थानी येऊन रडले होते”. असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. आता आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, फडणवीसांचे मोठे वक्तव्य

याबाबत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचयाकडे कुठे लक्ष देता, ते जाऊ द्या रे. ते लहान आहेत. अशा दोनच शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे.

गोमूत्र ठरतंय आरोग्याला हानिकारक! संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version