Cheetah Is Back: तब्बल 70 वर्षांनंतर नामिबियातून भारतात आले आठ विदेशी चित्ते

Eight exotic cheetahs came to India from Namibia after almost 70 years

दिल्ली : तब्बल 70 वर्षांनंतर आफ्रिकन देश नामिबियातून (African country Namibia) आठ विदेशी चित्ते भारतात पोहचले आहेत. एक विशेष हेलिकॉप्टरद्वारे या आठ चित्त्यांना (eight cheetah) मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर (Gwalior) येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. हे आठ चित्ते भारतात आणण्यासाठी कार्गो फ्लाईट बोईंग 717 या विशेष विमानाची निवड करण्यात आली आहे. हे विमान नामिबियाहून थेट सुमारे 8000 किलोमीटरचं अंतर पार करत भारतात येईल. आफ्रिकन देश नामिबिया. (Namibia) याच देशातून आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत.

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंनी वेळेआधीच उरकला औरंगाबादचा कार्यक्रम, 15 मिनिटात दाखवली मराठवाड्याला ‘ही’ मोठी स्वप्न

1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर सात दशकांनंतर भारतामध्ये त्यांच्या पुन:परिचयासाठी दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले जात आहेत. दरम्यान एक विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले आहे. येथून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. नामिबियाचे हे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथे पोहोचले आहेत. विशेष म्हणजे प्राणीप्रेमींमध्ये कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे.

Narayan Rane On Aadity Thakrea: “अहो सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे सैरभैर झालेत”, नारायण राणेंचा घणाघात

या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. तर 3 नर चित्यांमध्ये 2 सख्खे भाऊ आहेत. या सख्ये भाऊ असलेल्या चित्त्यांच वय साडे पाच वर्ष आहे. तर तिसऱ्या नर चित्याचं वय साडे चार वर्ष आहे. तसेच 5 मादी चित्त्यांचं वय 2 वर्षे ते 5 वर्षांपर्यंत आहे. महत्वाचं म्हणजे या चित्यांचं आयुष्य जास्तीत जास्त 12 वर्षे असते, अशी माहिती देण्यात आली आहे. नामिबियातून (Namibia) भारतात आलेल्या याच चित्त्यांची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे.

खुशखबर! आता शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ‘एवढ्या’ कोटींचे अनुदान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *