
बारामतीमध्ये आज आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( NCP) अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकांना आरोग्यासाठी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कोणीही व्यसनाधीन होऊ नये. नाहीतर पी दारू…खा गुटखा..रोज तंबाखू बिडी..सिगारेट पिणे म्हणजे स्वत: आपल्या शरीराचा नाश करणे आहे. असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
मोठी बातमी! सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन
याशिवाय मुला-मुलींकडे लक्ष देऊन त्यांना व्यसनापासून लांब ठेवले पाहिजे, असा सल्ला देखील अजित पवारांनी यावेळी दिला आहे. दरम्यान त्यांनी वाढत्या प्रदूषणाबाबत देखील महत्त्वाचे भाष्य केले आहे. ” पुणे, मुबंई, दिल्ली याठिकाणी सर्वात जास्त प्रदूषण आहे. आम्ही मुंबई मध्ये राहतो आणि तिथेच सर्वात जास्त प्रदूषण आहे. मात्र नाईलाज असल्याने आम्ही तिथे राहतो. ” असे अजित पवार म्हणाले आहेत.
तरुणाने वृद्ध व्यक्तीला दुचाकीसह नेलं फरपटत; पाहा VIDEO
आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने कसे नुकसान होते, याबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. मी एकदा बाहेर गेलो होतो, तेव्हा माझ्या डोळ्याला काहीतरी झाले होते. तेव्हा मी दुर्लक्ष केले. परंतु, मंत्रालयात बसलो असता, डोळ्यात खूप खुपू लागले आणि मी गाडी काढून हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळी डॉक्टरांनी रेटिनाचा प्रोब्लेम असून डोळ्यांचे ऑपरेशन करायला सांगितले. डोळ्यांचे थोडे दुखणे दुर्लक्ष केल्याने गोष्ट एवढी गंभीर झाली. असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
पार्थ पवार नाराज?; घेतली शंभुराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकर म्हणतात…