Site icon e लोकहित | Marathi News

कांदा उत्पादकांची दिवाळी, खरीप कांदा मुहूर्ताला मिळाला ‘इतका’ उच्चांकी भाव

Diwali, Kharif Onion Muhurta of Onion growers got 'so' high prices

कांदा उत्पादकांच्या कांद्याला (Onion) मागील काही दिवसांपूर्वी पाहिजे असा बाजारभाव मिळाला नाही. बाजारभाव म्हणजे अनेक ठिकाणी तर कांदा (Onion Rate) एक रुपया किलोने विकला गेला. इतकंच नाही कर काही शेतकऱ्यांना (Farmers) हमाली आणि इतर खर्च धरून बिलाचा एक रुपयाही मिळाला नाही. परंतु यंदा मात्र कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी खरीप हंगामातील (Kharip season) कांद्याला मुहूर्तालाच चांगला भाव मिळाला आहे.

माणुसकी दाखवणे पडले महागात, अज्ञात व्यक्तीला दिली लिफ्ट आण तो निघाला चोर

कांद्याला मिळाला इतका भाव?

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील देवळा, चांदवड हे तालुके खरीप लागवडीसाठी नेहमीच पुढे असतात. तसेच दसऱ्याचा मुहूर्त साधून अनेक ग्रामीण भागांत शेतमालाचे लिलाव केले जातात.दरम्यान उमराणे व मुंगसे या बाजारात कांद्याचा लिलाव झाला. यावेळी उमराणे तालुका देवळा येथील खारी फाट्यावरील श्री रामेश्वर कृषी मार्केट आवारात मुहूर्ताला कांद्याला तब्बल 11 हजार 111 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

विद्युत तारेच्या करंटने एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे हा भाव तेथील जिल्ह्यातील उच्चांकी दर ठरला आहे. महत्वाची बाब म्हणजे कांद्याच्या लिलावात बोली लागल्यानंतर हा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Shrigonda: श्रीगोंद्यातील महिलेचा मृतदेह जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना आली समोर! पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

Spread the love
Exit mobile version