
मुंबई : रविवारी सकाळी सातच्या सुमारास इडीच पथक संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पोहोचल. त्यांच्या घरातील कागदपत्र व दस्तावेज अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले व साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. यावर अनेक राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या. आता कलाकार देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.
या संपूर्ण प्रकारणाबाब अभिनेता आरोह वेलणकरने (Aroha Welankar) देखील ट्विट केलं आहे. आरोह वेलणकर राजकीय मुद्द्यावर सतत आपले मत मांडत असतो. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामधील घडामोडींबाबत त्याने आपलं मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं.
आरोहने ट्विट करत लिहिले की, बाकी सगळं सोडा हो, पैसे खाल्ले की नाही यावर बोला, भ्रष्टाचार केला की नाही यावर बोला… काय?” सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. या ट्विटवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.
या ट्विटमुळे आरोहला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या ट्विट वर एक युजरने कमेंट केली कि, “बाकी सगळं सोड पण तुझे चित्रपट का चालत नाही ह्यावर बोल” तर काही लोकांनी आरोहला ट्विट नको करत जाऊ असा सल्ला देखील दिला आहे.