Site icon e लोकहित | Marathi News

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांचा पीएफआयच्या समर्थकांना इशारा,”…पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही”

Devendra Fadnavis warns PFI supporters, "…Pakistan will not spare those who raise slogans of Zindabad"

पुणे: शुक्रवारी सायंकाळी पुण्यात (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या समर्थकांनी (Supporters of PFI) पाकिस्तान झिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी (Sloganism) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Narendra Modi: धक्कादायक! पिएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी; ईडीने केला दावा

महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तसेच त्यांच्यावर कारवाई करू, घोषणा देणारे जिकडे असतील तिकडे जाऊन त्यांना शोधून काढू असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हंटल आहे. त्यांच्या या घोषणाबाजी मुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओ विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय.

Milk: आता दुधाच्या दरात होणार वाढ, ‘ही’ डेअरी घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय

दरम्यान, या छाप्यात 106 म्होरक्यांना अटक केली. म्हणून PFI समर्थकांनी अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलने केली. या आंदोलनांमध्येच आता पुण्यात पीएफआयच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

डेंग्यू-मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून सावधान, या पाच नैसर्गिक वस्तूंमुळे होईल बचाव

Spread the love
Exit mobile version