Site icon e लोकहित | Marathi News

एक मुलगा असूनसुद्धा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार; ‘या’ दिवशी करणार लग्न

Despite having a son, Hardik Pandya will tie the knot once again; Will get married on 'this' day

सध्या सगळीकडेच लग्नसराईची लगबग सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी एकामागून एक लग्नबांधनात अडकत आहेत. अशातच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 2020 मध्ये हार्दिकने अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले होते. त्या दोघांना अगस्त नावाचा एक मुलगा देखील आहे.

बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार मात्र पक्षाबाबत नाराजी कायम!

हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक आता पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजे उद्याच (ता.14) हे दोघेही लग्न करणार आहेत. उदयपूर ( Udaypur) येथे एक भव्य समारंभात हार्दिक आणि नताशा सात फेरे घेतील. ( Hardik Pandya’s Marriage) खरंतर हे लग्न आजपासूनच सुरू झाले असून यामध्ये मेहेंदी, संगीत व हळद असे कार्यक्रम होणार आहेत.

“सापाला वाचवायला गेला अन् तरुणासोबत घडलं असं की….” पाहा VIDEO

2020 मध्ये न्यु इअर पार्टी मध्ये हार्दिकने नताशाला प्रपोज केले होते. यावेळी नताशाच्या बोटात अंगठी घालत त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. या क्षणाचा व्हिडीओ देखील हार्दिकने ‘मे तेरा तु मेरी, जाने सारा हिंदुस्तान अशा कॅप्शन सोबत शेअर केला होता. हार्दिक आणि नताशाची भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. यानंतर त्यांनी आपलं बोलणं सुरु ठेवलं आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात

Spread the love
Exit mobile version