Site icon e लोकहित | Marathi News

Deepika Padukone : “…आत्महत्या करण्याचा विचार देखील यायचा.”, दीपिका पदुकोणचा धक्कादायक खुलासा

Deepika Padukone's shocking revelation, "…I used to think about suicide."

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत. तिच्या आयुष्यात आलेला नैराश्याचा काळ, नातेसंबंध, वैयक्तिक आयुष्य यांवर दीपिका नेहमीच मनमोकळेपणाने बोलत असते. यावेळी देखील एका मुलाखतीमध्ये दीपिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

दीपिका म्हणाली, “त्यावेळी नैराश्य येण्यामागचे तसे काही कारण नव्हते. तो माझ्या करिअरमधील उत्तम काळ होता. सगळं व्यवस्थित सुरू होत. पण तरीही मी कधी कधी पूर्णपणे खचून जायचे. अशावेळी आत्महत्या करण्याचा विचार देखील यायचा.”

पुढे ती म्हणाली, “एकदा माझे आई वडील घरी आले असताना त्यांनी मला पूर्ण खचलेले पाहिलं. त्यावरून माझ्या आईला हे नैराश्य असल्याचे लक्षात आले आणि आईमुळे मला यातून बाहेर पडण्यास मदत झाली”.

Spread the love
Exit mobile version