
Daund Kalakendra Firing Update | पुणे जिल्ह्यातील दौंड येथील अंबिका कलाकेंद्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या घटनेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, पोलिसांना सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत.
Manikrao Kokate । भिकारी सरकार, शेतकरी नाही” – कृषीमंत्री कोकाटेंच्या विधानावरून राजकारणात खळबळ
अनेक माध्यमांमध्ये या घटनेत एक महिला डान्सर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रत्यक्षात या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. “गोळीबाराच्या आवाजाने एक महिला घाबरून क्षणभर बेशुद्ध झाली होती. मात्र तिला तात्काळ पाणी देऊन शुद्धीवर आणण्यात आले. कोणीही गोळीने जखमी झालेले नाही,” असं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींकडे शस्त्र परवाना होता की नव्हता, याचीही चौकशी केली जात आहे. तसेच या गुन्ह्याला मकोका (MCOCA) अंतर्गत आणता येईल का, याचीही पडताळणी केली जाईल.”
Manikrao Kokate । रमीचा डाव उघडा पडला? कोकाटेंचे आणखी धक्कादायक व्हिडीओ बाहेर
या प्रकरणात एका आमदाराच्या चुलत भावाचे नाव पुढे आले असून, त्यावरून अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अजित पवार यांनी याबाबतही ठाम भूमिका घेतली आहे. “संबंधित आरोपी आमदाराचा सख्खा नव्हे, तर चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. कोणालाही वाचवू नका. आरोपी कोणताही असो, अटक ठरलेली आहे,” असे स्पष्ट आदेशच त्यांनी पोलिसांना दिले.