
Suhani Bhatnagar Death । अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) दंगल (Dangal) हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमातील गाणी आजही आवर्जून ऐकली जातात. अशातच आता बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. या सिनेमात आमिर खानची मुलगी असणाऱ्या छोट्या बबिताची भूमिकेत सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) दिसली होती. याच सुहानी भटनागरने 19व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. (Latest marathi news)
धक्कादायक बाब म्हणजे सुहानीच्या संपूर्ण शरीरात फ्लूइड (Fluid) साठले होते, असे सांगण्यात येत आहे. काही काळापूर्वी तिचा अपघात देखील झाला होता, यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. पण उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम झाला. याचा औषधांमुळे तिच्या शरीरात हळूहळू द्रव जमा होऊ लागले. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.
Sharad Pawar । अजितदादांच्या ‘त्या’ आवाहनावर शरद पवारांचं आव्हान; म्हणाले, “बारामतीतून कोणीही..”
पण या औषधोपचारांचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. तिने अभ्यासासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा अभिनयाकडे परतणार होती. पण तिचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे.
Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे पुन्हा अडचणीत! मोठं कारण आलं समोर