गोमूत्र ठरतंय आरोग्याला हानिकारक! संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती; वाचा सविस्तर

Cow urine is harmful to health! Shocking information revealed in the research; Read in detail

भारतात गाईचं गोमूत्र पवित्र आणि जंतू विनाशकारी समजलं जातं. परंतु, माणसांच्या आरोग्यासाठी गोमूत्र योग्य नाही अशी माहिती एका संशोधनात समोर आली आहे. बऱ्याचदा अनेक आजारांमध्ये गोमूत्राचे सेवन फायदेशीर असतं असं सांगितलं जातं. मात्र, अलिकडेच झालेल्या संशोधनात असे दिसून आले की, गोमूत्राचे सेवन करणे मानवासाठी योग्य नाही.

शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला मिळणार 2 लाख रुपये; ‘या’ नेत्याने केली मोठी घोषणा

Bareilly-based ICAR-Indian Veterinary Research Institute देशामधील प्रमुख प्राणी संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, म्हशीचे मूत्र काही जीवाणूंवर जास्त प्रभावी होत आहे. विशेष करून भारतीय बाजारपेठे मधील बरेच पुरवठादार गोमूत्र मोठ्या प्रमाणात Food Safety and Standards Authority of India (FSSAI) ट्रेडमार्कविनाच विकतात .या संस्थेच्या भोजराज सिंह यांच्या नेतृत्वात तीन PHD विद्यार्थ्यांवर गोमूत्रा बाबत मानवामध्ये वापर करण्याबद्दल संशोधन करण्यात आलेलं आहे. संशोधनात असे सिद्ध झाले आहे, की गाई आणि बैलांच्या मूत्रामध्ये १४ प्रकारचे विषाणू असतात. त्यामध्ये Escherichia coli चा समावेश आहे, त्यामुळे पोटामध्ये संक्रमण होण्याची शक्यता आहे.

गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज दोघांनाही लोक नाव ठेवतात; ज्येष्ठ साहित्यिकाची जोरदार टीका

या संशोधनाचे परिणाम Research Gate या online संशोधन वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या संस्थेमधील Epidemiology या विभागाचे प्रमुख सिंग म्हंटले की, गाय, म्हैस आणि माणसांच्या ७३ मूत्र नमुन्यांमधील सांख्यिकीय संशोधनातून असे दिसले आहे की, गोमूत्राच्या तुलनेत म्हशीच्या मूत्रात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, तर हे प्रमाण गाई पेक्षा अधिक म्हशीमध्ये आढळते. सोप्या भाषेत , (S. epidermidis) आणि (E. rhapontici) सारख्या विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध लढण्यासाठी म्हशीच्या मूत्राचा वापर अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले.

“…तर आमदार, खासदारांना मारा”; प्रकाश आंबेडकर यांच खळबळजनक वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *