Site icon e लोकहित | Marathi News

Congress candidate list । ब्रेकिंग! पुण्यात रवींद्र धंगेकर तर कोल्हापुरात शाहू महाराज, महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress Candidate List

Congress candidate list । सध्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

Ramdas Athawale Accident । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! रामदास आठवले यांच्या गाडीचा भीषण अपघात; कंटेनरने दिली जोरदार धडक

माहितीनुसार, या यादीतून पुण्यामधून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नांदेड मधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Congress । राजकारणात खळबळ! काँग्रेला धक्का, मुंबईत फक्त मिळणार इतक्या जागा

महाराष्ट्रातील ‘या’ 7 उमेदवारांची नावे जाहीर

१) पुणे – रवींद्र धंगेकर

२) नंदुरबार – गोवाल पाडवी

३) अमरावती – वळवंत वानखेडे

४) सोलापूर – प्रणिती शिंदे

५) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती

६) लातूर – डॉ. शिवाजी कलगे

७) नांदेड – वसंतराव चव्हाण

Indapur Crime । ब्रेकिंग! इंदापूर गोळीबार प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात; मैत्रिणीला भेटायला गेला अन् पोलिसांनी..

Spread the love
Exit mobile version