
अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. आता सध्या असाच एक अपघात झाला आहे. खासगी आराम बस आणि ट्रक याचा सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) पाथरे शिवारात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. आता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
धक्कादायक! पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटून अग्नितांडव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर या अपघातामध्ये मृत्यु झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे देखील जाहीर केले आहे.
जगातील पहिले रोबोट कॅफे! कॉफी पासून स्नॅक्स पर्यंत रोबोटच बनवून हातात देणार…
दरम्यान, मुंबई (Mumbai) कडून शिर्डी कडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नरकडे (Sinner) जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण आपघात झाला. एकेरी वाहतूक सुरु असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
राखी सावंत प्रेग्नेंट? मोठा खुलासा करत म्हणाली…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी बस व ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता जखमी लोकांवर रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरु आहे.