Site icon e लोकहित | Marathi News

राजकारणासोबत शेतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहीर; ‘ही’ माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Chief Minister Eknath Shinde Mahir in agriculture along with politics; You will also be surprised to read this information!

मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी फार कमी वेळ मिळतो. यासाठी त्यांना अध्येमध्ये स्वतःहून वेळ काढावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राजकारण आणि मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारी मधून सध्या थोडासा ब्रेक घेतला आहे. यासाठी ते त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. दरम्यान त्यांच्या शेताची ( Farm) त्यांनी पाहणी केली.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका बंद होणार?

महाबळेश्वर मधील दरे ( Dare) गावात चार महिन्यांपूर्वी शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी लावलेल्या स्ट्रॉबेरीला आता फळे आली आहेत. या फळांची चवही त्यांनी यावेळी चाखली. सध्या त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद व गवती चहा ही पिके आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला असून त्यांनी शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरलेले नाही.

“फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही” – राज ठाकरे

परराज्यात पिकणाऱ्या गवती चहाचे मळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात फुलवले असून त्यांची उंची तब्बल 10 फूट इतकी आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापन यामुळे शिंदे यांची शेती उत्तमप्रकारे फुलली आहे. राज्याच्या राजकारणासोबत त्यांनी आपल्या शेतीकडे देखील लक्ष दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गावीच असून मांढरदेवीची यात्रा करून ते मुंबईकडे ( Mumbai) रवाना होणार आहेत.

भीमा पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरा दिवसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Spread the love
Exit mobile version