Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुणे दौऱ्यावेळी केली पुरंदर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाहणी!

Chief Minister Eknath Shinde inspects regional water supply scheme in Purandar taluka during his visit to Pune!

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवाज २ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदेनी काही महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच जिल्ह्यांची पाहणी आणि विकासकामांचा आढावा देखील घेतला. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पुरंदर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची देखील पाहणी केली.

एकनाथ शिंदेनी आज पुणे दौऱ्यादरम्यान पुरंदर तालुक्यातील तुकाई दर्शन टेकडी येथील फुरसुंगी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन पाहणी केली. शहरातील या अत्यंत महत्त्वाचा पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाला संबंधित सूचना देखील दिल्या.

यावेळी, खासदार श्रीरंग बारणे,आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे,अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

Spread the love
Exit mobile version