Chhatrapati Sambhajinagar । धक्कादायक बातमी! राज्यात उष्माघाताने घेतला तरुणाचा बळी

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar । सध्या एप्रिल महिना चालू झाला आहे. मात्र मार्च महिन्यापासून चान्गलीच उष्णतेची लाट आली आहे. मागच्या काही दिवसापासूनआकाशातून आगीचा वर्षाव होत आहे. त्याचा परिणाम खाली जमिनीवर दिसून येतो. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. दरम्यान, राज्यात उष्णतेच्या लाटेने पहिला बळी घेतला आहे.

Maharashtra Loksabha । ‘निवडणूक जिंकल्यास प्रत्येक गावात बिअर बार’; महिला उमेदवाराच्या विचित्र आश्वासनामुळे खळबळ

छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उष्माघाताच पहिला बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये ही घटना घडली आहे. गणेश राधेश्याम कुलकर्णी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या उष्माघाताने गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Supriya Sule । “शरद पवार यांना संपवण्यासाठी…” सुप्रिया सुळे यांचे धक्कादायक वक्तव्य

याबाबत अधिकची माहिती अशी की, हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन या ठिकाणी एका खासगी कंपनीत कामाला होता. गणेश हा जैनपूर मार्गाने बिडकीनकडे येत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला. यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला तपासून मृत घोषित केले. गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Maharashtra politics । अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्र्यांसमोरच कार्यकर्ते भिडले

Spread the love