
सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन आल्याची घटना घडली आहे. यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले.
ऐश्वर्या रायने चक्क विमानाच्या टॉयलेट मध्ये पिले सिगारेट; जाब विचारताच शाहरुख खानचे नाव केले पुढे
माहितीनुसार, एका व्यक्तीने 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्री मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. याबाबत पोलीस कंट्रोल रुममध्ये जवळपास 7 कॉल आले. या कॉल केलेल्या व्यक्तीने बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा केला आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे तातडीने नरेंद्र मोदींच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले.
सोनू निगमचा जीव थोडक्यात वाचला; कार्यक्रमादरम्यान झाली धक्काबुक्की
या प्रकरणाचा निवासस्थानी कसून शोध घेण्यात आला. बॉम्ब विरोधी पथकाने एकेक कोपरा शोधून काढला मात्र बॉम्ब कोठेही सापडला नाही. दरम्यान फोन केलेल्या आरोपीला पकडण्यात देखील दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
माजी राज्यपालांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली; म्हणाले, “ही व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या…”