Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! संजय राऊत धमकी प्रकरणात एकजण पोलिसांच्या ताब्यात

Breaking! One person in police custody in Sanjay Raut threat case

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सगळीकडे खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती हा पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! ‘त्या’ व्हायरल व्हीडिओप्रकरणी सरपंचाविरोधातच पोलिस तक्रार

माहितीनुसार, राऊतांना काल रात्री 9 वाजता त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, आता प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी! अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून एका २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, राहुल तळेकर या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुण्यातील खराडी भागात पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

जीवे मारण्याच्या धमकीनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया –

संजय राऊत म्हणाले, धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा हटवली. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलगा एक षडयंत्र रचतो. एका गुंडाला हाताशी धरून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचतो. त्याची माहिती दिल्यानंतर मी स्टंट करतो असं राज्याचे गृहमंत्री म्हणतात अशी जोरदार टीका यावेळी राऊतांनी सरकारवर केली आहे.

त्याचबरोबर राऊत पुढे बोलताना म्हणाले, मागच्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिष्णोईच्या गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आता त्याच गँगने मला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे धमकी आल्यानंतर मी लगेचच पोलिसांना कळवलं आहे. उद्या मी कळवलं नाही असं होऊ नाही म्हणून मी पोलिसांना लगेच कळवल्याचं राऊत यावेळी म्हणाले आहेत.

“मला माफ करा, मी माझ्या वेशभूषेत बदल करणार…” उर्फीने घेतला मोठा निर्णय

Spread the love
Exit mobile version