Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! IPL सुरु असतानाच क्रीडा विश्वावर शोककळा; टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

Breaking! As IPL continues, sports world mourns; The legendary cricketer of Team India passed away

सध्या सगळीकडे आयपीएलची क्रेज पाहायला मिळत आहे. यामध्ये सध्या क्रिकेट विश्वातून एक अतिशय वाईट बातमी बमोर आली आहे. टीम इंडियाकडून 3 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलेल्या आणि त्यानंतर पीच क्युरेटरची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडलेल्या सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

“फोटो बघून गुन्हे दाखल होतील…” गौतमी पाटीलचा कार्यक्रम अचानक बंद; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे क्रीडा विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, मागच्या काही दिवसापूर्वी सुधीर नाईक हे घरी पडले नंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आले.

ब्रेकिंग! पृथ्वी शॉ वर गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

२६ मार्चला त्यांना मुंबईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर तेव्हापासून उपचार सुरु होते. मात्र त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी 5 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.

आदित्य ठाकरे यांनी भरसभेत केली एकनाथ शिंदेंची नक्कल!

Spread the love
Exit mobile version