
नेपाळमधील (Nepal) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pokhara International Airport) 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले. या विमानामध्ये विमानात 5 भारतीयांसह 68 प्रवासी होते. आता या विमान अपघातामध्ये सर्व 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे.
ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर; तब्येत खालावली! सुश्मिता सेनच्या भावाने दिली माहिती
या अपघातांनंतर पोखरा विमानतळावर नेपाळ सरकारने (Government of Nepal) मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पंतप्रधान दहल यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनास्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “थोडस दुर्देव होतं बाकी…”
माहितीनुसार खराब हवामानामुळे विमान डोंगराला धडकले आणि हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
भाजप खासदार बृजभूषण संभाजी महाराजांबद्दल बोलताना चुकले; म्हणाले…