भटक्या कुत्र्यांना टाकले प्रेयसीच्या शरीराचे तुकडे, मीरा रोडमधील घटनेबाबत समोर आली धक्कादायक माहिती

Body parts of girlfriend thrown to stray dogs, shocking information has come out about the incident in Mira Road

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.

तिकडे मोठ्या बहिणीचं लग्न झालं अन् इकडे बारक्या बहिणीसोबत घडलं भयानक, वाचून बसेल धक्का

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपी चौकशीमध्ये धक्कदायक खुलासे देखील करत आहेत. त्यामुळे पोलीस देखील हादरून गेले आहेत.

लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले; मीरारोडमधील घटनेवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्यांना खायला घालत असल्याचे देखील बोलले जात आहे. याशिवाय मृतदेहाचे अवयव ड्रेनेज लाईनमध्ये फेकल्याची शक्यता देखील पोलिसांना आहे. त्यामुळे पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

मीरा रोडमधील भयानक घटना! लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, अन्… घटना वाचून तुम्हीही हादराल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियसीच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवायचा त्यांनतर मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि इमारतीच्या मागे नाल्यामध्ये फेकून द्यायचा. मनोज साने असं या आरोपीचं नाव आहे. सध्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

तुम्ही कधी पांढऱ्या आंब्याबद्दल ऐकलंय का? ‘या’ शहरात मिळतो ‘पांढरा आंबा’, जाणून घ्या काय आहे त्याची खासियत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *